जिल्हा परिषद निवडणुकीत कपबशी चिन्हाला मतदान मागणारे काँग्रेसचे निष्ठावान कसे – ना. विखे पाटील

2019-10-17T20:46:28
0

आश्वी (वार्ताहर) – जिल्हा परिषद निवडणुकीत कपबशी चिन्हाला मतदान मागणारे काँग्रेसचे निष्ठावान कसे होऊ शकतात? असा सवाल महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मतदारसंघातील विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद आणि संपर्काच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. ठिकठिकाणी उत्स्फूर्त त्यांचे स्वागत करण्यात आले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी, शिबलापूर, हंगेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ना. विखे […] The post जिल्हा परिषद निवडणुकीत कपबशी चिन्हाला मतदान मागणारे काँग्रेसचे निष्ठावान कसे – ना. विखे पाटील appeared first on Deshdoot.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील जनतेचा जाहीरनामा

2019-10-16T17:24:03
0

निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे.विधानसभा निवडणूकीच्या निमित्तानेकोकणच्या जनतेवतीने देण्यात आलेलाजाहीरनामा असा... १) पर्यावरण संरक्षण करण्यासाठी कायद्यात कडक सुधारणा व अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. २) राज्यातील वन कायद्यात सुधारणा करून जंगलतोड करण्यास प्रतिबंध लागू करावा. इको सेन्सिटिव्ह झोनची अंमलबजावणी, ग्राम जैवविविधता समित्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहन व अर्थसहाय्य द्यावे. सामाजिक वनीकरण सारख्या सरकारी धोरणांतून देशी झाडांची लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. ३) स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा उपयोग करून पर्यटन उद्योगातून स्थानिक युवक...

Vidhan Sabha 2019 :'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' हे आता युती सरकारलाच विचारा- डॉ. अमोल कोल्हे

2019-10-14T18:45:03
0

गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज येथे केले. कागल मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार हसन मुश्रीफ व चंदगड मतदारसंघाचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर ही सभा झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत जाहिरातींचा मारा करून राज्यात भाजपव शिवसेना सत्तेवर आली. पाच वर्षात सर्वच पातळींवर या सरकारला आलेले अपयश पाहता यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या भुलथापांना आता महाराष्ट्रातील जनता भुलणार नाही. - डाॅ. अमोल कोल्ह...

रत्नागिरी : जनजागृतीने 12 खवले मांजरांना जीवदान

2019-10-13T13:31:03
0

चिपळूण - काही वर्षांपूर्वी शंभराच्या वर खवले मांजरांची असलेली संख्या आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढी घसरल्याचे आढळले आहे. या प्राण्याचे अस्तित्व टिकवणे हेच खरे आव्हान निसर्गप्रेमींसमोर निर्माण झाले आहे. जगातील सर्वांत दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांमध्ये खवले मांजराचा समावेश झाला आहे, अशी माहिती सह्याद्री निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे. सह्याद्री निसर्ग मंडळाच्या या जनजागृती उपक्रमामुळे १२ खवले मांजरांना जीवदान मिळाले आहे. सह्याद्री निसर्ग मंडळाने नुकतेच खवले मांजराच्या पाहणीचे काम पूर्ण केले. जिल्ह्यात 40 ट्रॅप कॅमेराद्वारे ही पाहणी केली. कॅमेराद्वारे एक दिवस व एक रात्र या प्रमाणे "एक कॅमेरा दिवस' समजला जातो. याप्रमाणे एकूण 10 हजार कॅमेरा दिवसाची ही पाहणी पूर्ण झाली. या पाहणीचे निष्कर्ष धक्कादायक होते. खवले मांजर हा प्राणी केव...

सिंधुदुर्ग : करूळला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

2019-10-11T17:52:03
0

वैभववाडी - करूळ भोयडेवाडीला गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचातडाखा बसला. अचानक आलेल्या वादळामुळे करूळवासीय चक्रावून गेले. दहा ते पंधरा मिनिटे वादळ सुरू होते. यात शेकडो झाडे उन्मळून पडली. त्यातील काही झाडे पाच इमारतींवर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. करूळ परिसरातील भातशेतीलादेखील वादळाचा फटका बसला असून शेती भुईसपाट झाली आहे. जिल्ह्यात काही भागात सकाळच्या सत्रात कडक ऊन आणि सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पाऊस असे समीकरणच झाले आहे. गुरुवारी सायंकाळीसुद्धा जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. वैभववाडी आणि कणकवली तालुक्‍यातील काही भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, करूळ भोयडेवाडी येथे वादळाचा तडाखा बसला. दहा ते पंधरा मिनिटांत परिसरातील शेकडो झाडे उन्मळून...

पश्चिमी घाट को उजडऩे से बचाया जाए

2019-10-10T16:14:31
0

कर्नाटक वन्यजीव बोर्ड ने केंद्र व राज्य सरकारों से लगाई गुहार बेंगलूरु. कर्नाटक वन्यजीव बोर्ड (Karnataka Wildlife Board)ने पर्यावरण की दृष्टि से बेहद संवेदनशील पश्चिमी घाट (Western Ghat) को बचाने के लिए एक अभियान छेड़ा है। केंद्र व प्रदेश सरकार से मांग की है कि इस क्षेत्र में स्वीकृत या प्रस्तावित हर उस परियोजना को रद्द किया जाए, जिससे पर्यावरण (Environment), वन्यजीवों व वन क्षेत्र को खतरा है। बोर्ड के सदस्य जोसेफ हूवर (Joseph Hoover) ने बुधवार को कहा कि आठ वैश्विक स्थानों में पश्चिमी घाट की गिनती होती है। इसका दोहन अब बंद होना चाहिए। विशेषकर उन परिस्थितयों में जब आग ने अमेजन (Amazon) के जंगलों (Forest) को तबाह कर दिया है। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी (Narendra Modi) ने देश में वन क्षेत्र बढ़ाने की मंशा जाहिर की है। पर्यावर...

केवळ डोंगरच चढले नाही..तर अशीही केली कामगिरी

2019-10-10T12:04:03
0

इगतपुरी : सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत लपलेला चिचकूळ्या डोंगराची चढाई करणे म्हणजे खूपच मुश्किल.. मात्र पिढ्यान् पिढ्यांचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील राजमुद्रा ग्रुपचे युवक दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने मोठ्या धाडसाने औंढा किल्याचा सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चिचकूळ्या डोंगराची यशस्वी चढाई पूर्ण करतात. तेथील विस्कटलेले दगड निटनेटके करणे ,प्लास्टिक पिशव्या गोळा करुण परिसर अगदी सुशोभित करतात. युवकांकडून सामाजिक बांधिलकेचे कार्य जोमाने डोंगरावर असलेल्या वेताळ बाबा या जागृत देवस्थानात राजमुद्रा ग्रुपच्या वतीने आरती घेण्यात आली.तरुणांचे गडावरील स्वच्छता करण्यासाठी हात सरसावले आहेत.राज्यात राजमुद्रा परिवाराचे अनेक सदस्य असून ते या सामाजिक कार्यासाठी स्वतःला झोकून देत आहेत.शिवाजी महाराजांनी जोपासलेल...

समाजकार्याचे बाळकडूही आईकडूनच - प्रतापराव पवार

2019-10-10T05:27:03
0

पुणे - ‘चांगल्या संस्कारांबरोबरच समाजकार्याचे बाळकडूही आईने मला दिले. ही आमच्या कुटुंबातील संस्कृतीच आहे. आयुष्यात संगत कोणाची असावी याचे संचित देताना प्रत्येक गोष्टीमागे कुणाचे तरी कष्ट असतात, याची शिकवणही तिच्याकडूनच मिळाली आहे, त्यामुळे आजही प्रत्येक दिवसाच्या शेवटी दुसऱ्यांसाठी काय केले, याचा विचार नियमितपणे करतो, अशी भावना विद्यार्थी सहायक समिती आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली. विद्यार्थी सहायक समिती, माजी विद्यार्थी मंडळ यांनी प्रतापराव पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अमृत अनुभव’ या कृतज्ञता समारंभाचे आयोजन केले होते, यानिमित्ताने पवार यांच्या आयुष्याचा पट नागरिकांसमोर आला. त्यांच्या पत्नी भारती पवार यांनी समितीच्या वतीने पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी पवार यांचे मित्र, कुटुंबीय, सा...


Create AccountLog In Your Account