None

फासात अडकून बिबट्याचा मृत्यू

July 11, 2019, 11:08 p.m.
0

Country: India

Written in: Marathi; मराठी


Copyright: None

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील नरनाळा परिक्षेत्रात फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. नरनाळा क्षेत्रातील खंडाळा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ बफर क्षेत्रात ही घटना घडली. परिसरात अनेकांच्या शेतजमिनी आहेत. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी येथे लाकडाचा फास लावला होता. हा फास सायळची शिकार करण्यासाठी लावल्या गेल्याची शक्‍यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नेमका त्याच फासात गुरुवारी सकाळी हा बिबट अडकला. त्यानंतर त्यातून बाहेर पड..

Leopard Dead In The Hanger फासात अडकून बिबट्याचा मृत्यू सकाळ वृत्तसेवा 02.38 AM अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील नरनाळा परिक्षेत्रात फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील नरनाळा परिक्षेत्रात फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. नरनाळा क्षेत्रातील खंडाळा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ बफर क्षेत्रात ही घटना घडली. परिसरात अनेकांच्या शेतजमिनी आहेत. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी येथे लाकडाचा फास लावला होता. हा फास सायळची शिकार करण्यासाठी लावल्या गेल्याची शक्‍यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नेमका त्याच फासात गुरुवारी सकाळी हा बिबट अडकला. त्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने धडपड केली. त्याच धडपडीत बिबटचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. परिसरातील ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. शासकीय पशुशल्यचिकित्सकांसह वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत बिबट हा एक वर्षे वयाचा असल्याने नरनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी विश्‍वनाथ चव्हाण यांनी सांगितले. दुपारी जंगलात पंचनामा केल्यानंतर मृत बिबट्याला जाळण्यात आले.


Comments
Leave a comment

Create AccountLog In Your Account